पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाः देशातील ६४ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तीन राज्यात एकूण मिळून ४१७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण मृतांच्या आकड्यापैकी हे प्रमाण ६७ टक्के आहे. 

कोरोनाशी लढा: डॉक्टरांना मिळणार सुरक्षा, गृहमंत्र्यांचे आश्वासन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये १९ आणखी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मृतांचा आकडा २५१ वर पोहचला आहे. गुजरातमध्ये २४ तासांत १९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९० वर पोहचला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ७६ वर पोहचला आहे. 

वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख

दरम्यान, देशभरामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशामध्ये कोरोनामुळे ६४० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या १९ हजार ९८४ रुग्णांपैकी १५ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३ हजार ८७० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

लॉकडाऊन काळात स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ