पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेमसंबंधातून ६२ वर्षांच्या डॉक्टरकडून ५५ वर्षांच्या महिलेचा खून आणि नंतर आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

दिल्लीतील रोहिणी भागात बुधवारी सकाळी एका कारमध्ये सापडलेल्या पुरुष आणि महिलेच्या मृतदेहांचे गूढ उकलले आहे. प्रेमसंबंधांतून ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात ६२ वर्षांच्या डॉक्टरने आधी ५५ वर्षांच्या महिलेचा त्याच्याकडील पिस्तूलमधून गोळ्या घालून खून केला. त्यानंतर त्याच पिस्तूलमधून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

'शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कट रचण्यात आला होता'

रोहिणी भागाचे पोलिस उपायुक्त एस डी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर हे याच भागातील एका रुग्णालयात जनरल फिजिशिअन म्हणून कार्यरत होते. तर संबंधित महिला ही एका नर्सिंग होमची व्यवस्थापकीय संचालक होती. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. डॉक्टरांनी आपल्याशी लग्न करावे, अशी संबंधित महिलेची मागणी होती. त्याला डॉक्टरांचा विरोध होता. त्यातूनच त्यांनी महिलेचा गोळ्या झाडून खून केला आणि नंतर आत्महत्या केली.

चिदंबरम यांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर

पोलिसांनी सांगितले की संबंधित डॉक्टर विवाहित असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते दोघेही डॉक्टरच आहेत. महिलेची घरगुती पार्श्वभूमी अद्याप समजलेली नाही. डॉक्टरांनी महिलेच्या छातीत गोळ्या झाडून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.