पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नातीवरील लैंगिक अत्याचार रोखण्याच्या प्रयत्नात आजीचा मृत्यू

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

आपल्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांच्या प्रयत्नात असलेल्यांना रोखताना पश्चिम बंगालमध्ये एका वयोवृद्ध महिलेला आपले प्राण गमवावे लागले. पश्चिम बंगालमधील बेऱ्हामपोरमध्ये ही घटना घडली. 

VIDEO : १०० दिवसांत काय केले १११ सेकंदात पाहा, शिवसेनेचा खास व्हिडिओ

१५ वर्षांच्या नातीसह तिची ६२ वर्षांची आजी या ठिकाणी राहात होती. या मुलीच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले आहे. एक ३७ वर्षांचा तरूण या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होता. तिच्या आजीला हे माहिती होते. गेल्या बुधवारी रात्री तो तरूण येत असल्याचे पाहून आजीने आपल्या नातीला घरात कोंडून ठेवले आणि बाहेरून कडी लावून टाकली. त्यानंतर ती मदतीची याचना करण्यासाठी गावातील वस्तीच्या ठिकाणी निघाली. पण त्याचवेळी तिथे आलेल्या आरोपी तरुणाने तिला जोरदार मारहाण केली. याच मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

'आमचे आमदार विकायला नाही ठेवलेले'

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोपी तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.