पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' ४९ कलाकारांच्या भूमिकेवर कंगना, प्रसूनसह ६१ कलाकारांचं प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी

चित्रपटसृष्टीतील ४१ कलाकारांनी मोदींना देशात वाढत चाललेल्या  झुंडबळीच्या घटनांवर चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. या पत्रात झुंडबळी, रामाच्या नावाचा गैरवापर करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असे अनेक मुद्दे अधोरेखित करत देशाच्या भविष्याविषयी चिंता व्यक्ती केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत देशातील  ६१ कलाकारांनी मोदींच्या समर्थनार्थ पत्र लिहित, या कलाकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता, येडियुरप्पा यांचा आजच शपथविधी

'सध्याच्या परिस्थितीचे चुकीच्या पद्धतीने कथन  केले जात आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ४९ कलाकार जे स्वत:ला देशाचे आणि लोकशाही मुल्याचे  'रक्षक' समजतात त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा पूर्वग्रह मध्ये आणत चिंता व्यक्त केली आहे. हे रक्षक  आपल्या चुकीच्या कथनाने भारताची प्रतिमा मलिन करू पाहत आहेत', असे या पत्रात म्हटले आहे. 

'नक्षलवाद्यांनी अनेक लोकांचे प्राण घेतले, फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये  शाळा पेटवल्या तेव्हा हे लोक शांत बसले होते.  तिहेरी तलाकविरोधात मुस्लिम महिला उभ्या ठाकल्या त्यावेळी यातील एकही व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली नाही. देशातल्या मोठ्या विद्यापीठात देशद्रोही घोषणा दिल्या त्यावेळीदेखील या कथित रक्षकांनी मौन बाळगणे पसंत केले. ' असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

'सरकारविरोधी घोषणा देणे म्हणजे देशद्रोही असणे यावर ते वाद घालत आहेत. मात्र मोदी सरकारच्या काळातच त्यांनी सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगले आहे. भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, मात्र त्याचा गैरवापर करून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ', ही बाब या पत्राद्वारे अधोरेखित करण्यात आली आहे. 

मुंबई विमानतळावर 'ध' चा 'मा', 'बॉम्बे' म्हटल्याचे ऐकले 'बॉम्ब है'

रामाच्या नावाचा गैरवापर करून जमावाकडून हल्ले करण्यात आले, असा या ४९ कलाकारांचा दावा आहे, मात्र अनेक तक्रारी या खोट्या असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  त्याचबरोबर आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांचा दाखला या पत्रात दिला आहे. या घटनांच्यावेळी हे कलाकार गप्प का बसले असा प्रश्नही या पत्राद्वारे विचारण्यात आला आहे. एकूण १२ घटनांचा यात समावेश असून या घटनांबाबत कलाकारांनी ब्र देखील  का उच्चारला नाही? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. 

प्रसून जोशी, कंगना राणौत,  विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ६९ जणांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:61 celebs question selective outrage of 49 Celeb who wrote letter to Prime Minister Narendra Modi expressed concern over mob violence