पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, सहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या महाराजांवर अद्याप अंत्यसंस्कार नाही

आशुतोष महाराज

चंदीगढजवळ असलेल्या नूरमहाल भागातील दिव्य ज्योती जागृती संस्थानचे प्रमुख आशुतोष महाराज यांचे निधन होऊन सहा वर्षे उलटली आहेत. पण त्यांचे पार्थिव अद्याप मठातील (डेरा) फ्रिजरमध्ये ठेवण्यात आले आहे. महाराजांच्या भक्तांची अशी धारणा आहे की महाराज समाधीमध्ये आहेत आणि ते लवकरच परत येतील.

२९ जानेवारी २०१४ रोजी मठातील भक्तांनी रात्री उशिरा सदगुरू अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावून घेतले. आशुतोष महाराजांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांना बोलाविण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर महाराजांना मृत घोषित करण्यात आले. 

शाहिन बाग आंदोलनाचा निवडणुकीत भाजपला फायदा, अंतर्गत सर्वेक्षण

महाराजांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारीही करण्यात आली. दिल्लीहून अनेक मान्यवर यासाठी चंदीगढमध्ये दाखलही झाले. पण मठातील भक्तांनी महाराज समाधीमध्ये असून, ते लवकरच परततील, असे सांगत त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ताब्यात देण्यास नकार दिला.

काय चाललंय काय..., मुलांच्या लग्नाआधी पळालेले व्याही-विहीण अखेर परतले!

मठातील ज्या खोलीत फ्रिजरमध्ये महाराजांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. तिथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या खोलीबाहेर २४ तास भक्तगण आणि पंजाब पोलिस दलातील कर्मचारी पहारा देत असतात. अति महत्त्वाच्या व्यक्तींनाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही.