पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात आलेल्या ६ जणांचा कोरोनाने मृत्यू

निजामुद्दीन

तेलंगणमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहा जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मरकज तबलिगी जमातच्या मुख्यालयात धार्मिक कार्यक्रम आयोजित केला गेला होता.  या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या सगळ्यांचे संपर्क शोधून त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.  निजामुद्दीन परिसरातील  लोकांना सोमवारी रात्री उशीरा आणि  मंगळवारी सकाळी खासगी बसेसनं शहरातील विविध रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. 

३९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या या सहा जणांनी १३ मार्च ते १५ मार्चच्या दरम्यान  तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात  उपस्थिती लावली होती. त्यानंतर एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं. या धार्मिक कार्यात उपस्थिती लावलेल्या प्रत्येकानं समोर येऊन माहिती द्यावी त्यांच्या उपचारांचा खर्च उचलला जाईल, असं त्यात लिहलं होतं. 

दिल्ली सरकारनं निजामुद्दीन परिसरातील  २०० जणांना विलग केलं आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याची मोठी मोहीम दिल्ली पोलिसांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत १०० लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल आज येणार आहेत.

कोरोना : मृतदेह फक्त दहन करण्याचा आदेश मागे, नवाब मलिकांनी दिली माहिती

१ ते १५ मार्चपर्यंत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात इंडोनेशीया आणि मलेशियामधूनही काही लोक आले होते, यात एकूण २ हजार लोकांचा सहभाग होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतरही हा कार्यक्रम सुरुच होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.