पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडोदरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; 6 जणांचा मृत्यू

वडोदरा पाऊस

गुजरातमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातच्या अहमदाबाद, वडोदरा, वलसाड, नवसारी, राजकोट आणि सूरत या शहरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका वडोदरा शहराला बसला आहे. पावसामुळे वडोदरामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भाग पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. या पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वडोदरामध्ये बुधवारी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

अलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगले आठवड्यात पाडा - हायकोर्ट

मुसळधार पावसामुळे वडोदरामधून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पावसाची परिस्थिती पाहता बुधवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. 

उन्नाव पीडितेच्या कुटुंबाची सुरक्षेसाठी अनेक पत्रे, कारवाई नाही

दरम्यान, वडोदरा शहरामध्ये बुधवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या 12 तासांमध्ये 442 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गुजरात,महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर 40-50 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसंच नागरिकांनी देखील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे हवामान खात्याने सांगितले.  

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे सिद्धूंकडे हे पद येण्याची शक्यता

गुजरातमधील पावसाची परिस्थिती पाहता रस्त्यांसह विमानसेवा आणि रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर गुजरातमधील विमानतळ पावसामुळे बंद करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे ते देखील बंद करण्यात आले आहेत. तर बुधवारी 22 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढच्या 5 दिवसांमध्ये गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा मृत्यू; अमेरिकेची माहिती