पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाट धुक्यांमुळे कार कालव्यात कोसळली; ६ जणांचा मृत्यू

दिल्लीत धुक्यांमुळे अपघात

दिल्लीमध्ये थंडीने कहर केला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिल्लीमध्ये तापमान कमी कमी होत चालले आहे. थंडीमुळे दिल्लीमध्ये सगळीकडे दाट धुक्यांची चादर परसरली आहे. याच दाट धुक्यांमुळे दिल्लीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री ग्रेटर नोएडाच्या खेरली कालव्यात एक कार कोसळली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत्यू आणि जखमी झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तार: 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात राहणारे एक कुटुंब दिल्ली येथे येत होते. त्याच दरम्यान, ग्रेटर नोएडातील सिकंदराबाद रोडवर त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. धुक्यांमुळे त्यांची गाडी थेट कालव्यात कोसळली. या गाडीमधून एकूण ११ जण प्रवास करत होते. अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. 

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक आजपासून वाकडेवाडीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११.३० च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. अर्टिंगा गाडी संभलवरुन दिल्लीला जात होती. कार थेट कालव्यात कोसळली. अपघातामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

मंत्रिमंडळ विस्तार: 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता