पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाटणावरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात चिमुकलीचा मृत्यू

स्पाईसजेट विमान

स्पाईसजेट विमानामध्ये एका ६ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या बाळाला उपचारासाठी दिल्लीला आणण्यात येत होते. मात्र दिल्लीला पोहचण्याआधीच विमानामध्ये तिचा मृत्यू झाला.  

सगळा विचार करूनच आम्ही नव्या नेत्यांना पक्षात घेतो - उद्धव ठाकरे

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली आजारी होती. उपचारासाठी बिहारच्या पाटणा येथून तिला दिल्लीला आणण्यात येत होते. आई-वडिलांसोबत लहान मुलगी स्पाईसजेट विमान क्रमांक एसजी - ७४८१ ने दिल्लीला येत होते. मात्र दिल्लीला पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. 

राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का, सचिन अहिर शिवसेनेत

रचिता कुमारी असं या चिमुकलीचे नाव होते. ती बिहारच्या बेगूसरायमधील निंगा येथे राहणारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या हृदयाला छिंद्र होते. याच्या उपचारासाठी तिला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आणण्यात येत होते. आधीपासूनच तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. 

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा