पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेतील न्यू जर्सीत गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार

अमेरिका गोळीबार

अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका नागरिकासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. गोळीबाराची ही घटना शहराच्या बेव्यू भागामध्ये झाली आहे. बेव्यू परिसरात असलेल्या एका दुकानाबाहेर हा गोळीबार झाला आहे. गोळीबार झाला त्यावेळी दुकानासमोरील रस्त्यावर मोठी गर्दी  होती. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, बेव्यू आणि मार्टिन लूथर किंग रोडजवळ दुपारी झालेल्या या गोळीबारानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिसरात असलेल्या शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

माजी CM फडणवीसांना शिवसेनेकडून ही अपेक्षा

या गोळीबारानंतर स्वॉटसह पोलिसांचे आपत्कालीन सेवा पथक या भागात पाठविण्यात आले आहे. या गोळीबारात एक पोलिस अधिकारी आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये दोन संशयित हल्लेखोर देखील मारले गेले आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप हल्लेखोरांच्या ओळखीसंदर्भात सांगितले नाही.  

धोनीसाठी मनापासून लिहिलेल्या विराटच्या 'त्या' पोस्टचाही अनोखा विक्रम