पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

AN 32 विमान अपघातः ६ जवानांचे मृतदेह तर ७ जणांचे अवशेष सापडले

AN 32 विमान अपघातः ६ जवानांचे मृतदेह तर ७ जणांचे अवशेष सापडले (PTI FILE)

एएन- ३२ विमान अपघातात आपला जीव गमावलेल्या हवाईदलाच्या सहा कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि सात इतर जणांच्या पार्थिवाचे अवशेष मिळाले आहेत. अधिकृत सुत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. मागील एक आठवड्याहून अधिक काळापासून भारतीय हवाईदल अपघात झालेल्या ठिकाणी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत होते. खराब हवामानामुळे शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत होत्या. 

AN-32: सर्व १३ प्रवाशांचा मृतदेह आणि ब्लॅकबॉक्स सापडला

भारतीय हवाईदलाने म्हटले की, या अपघातात कोणीच जिवंत राहिले नाही. या संबंधी मृतांच्या नातेवाईकांना याची कल्पना देण्यात आली होती. या विमानात ८ क्रू सदस्यासह १३ जण प्रवास करत होते. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवली होती.

एएन- ३२ विमानाच्या शोधासाठी सुखोई, एमआय-१७, पी-८ आय, कार्टोसेटच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश पोलिस, आयटीबीपी आणि स्थानिक लोकांचीही मदत घेण्यात आली होती. त्याचबरोबर बेपत्ता विमानांची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

हवाई दलाचे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता

३ जून रोजी आसाममधील जोरहाट एअरबेसवरुन उड्डाणाच्या १ तासानंतर विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला होता. या विमानाने जोरहाटवरुन अरुणाचल प्रदेशातील मेनचुकाकडे उड्डाण केले होते.

सुमारे ९ दिवसांनंतर मोठ्या प्रयत्नानंतर विमानाचा सांगाडा सियांगमधील लीपोपासून १६ किमी लांब १२ हजार फुट उंचीवर आढळून आले होते.