पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने घेतला ५४ जणांचा बळी

उत्तर प्रदेश पाऊस

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसाने उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावासाने आतापर्यंत ५४ जणांचा बळी घेतला आहे. पावसाचा फटका उत्तर प्रदेशच्या शहरापासून ते गावापर्यंत सगळीकडे बसला आहे.

शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना; अजित पवारांची घेणार भेट?

पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाने १६१ घरांचे नुकसान झाले आहे. १७ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ५४ नागरिकांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू भिंत कोसळून, झाड अंगावर पडून, साप चावल्याने, घराचे छत कोसळल्यामुळे झाला आहे. 

काँग्रेसच्या तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत

अनेक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफची टीम सुरक्षित ठिकाणी हलवत आहे. उत्तर प्रदेशमधील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय, पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालयांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर दुसरीकडे बिहार आणि उत्तराखंडमध्ये देखील तिच परिस्थिती आहे. पावसामुळे दोन्ही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन पूराचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरले आहे.  

'राजीनामा दिला तरी अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही'