पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्ट्रेलियात ५ हजार उंटांना गोळ्या घालून केलं ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या पाच दिवसांत ऑस्ट्रेलियात ५ हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे, दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या दुष्काळग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून शॉर्पशूटरनं उंटांचा वेध घेत त्यांना ठार केलं आहे. 

अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी यावर आवाज उठवला आहे, त्यांची काळजी आम्ही समजू शकतो. उंट हे ऑस्ट्रेलियाचे स्थानिक प्राणी नाही, ते बाहेरच्या देशातून ऑस्ट्रेलियात आणले गेले. हे उंट स्थानिक आणि दुर्मिळ पशू, पक्षी वनस्पतींच्या प्रजातींना उपायकारक आहेत, त्यामुळे त्यांना ठार केल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. 

दुसऱ्या महायुद्धातील २५० किलोचे जिवंत बॉम्ब सापडले

पाणी आणि अन्नाच्या शोधात जंगली उंटांचे कळप इथल्या स्थानिक आदिवासी पाड्यांमध्ये शिरत आहेत. दक्षिण  ऑस्ट्रेलियातील एपीवायमध्ये विलुप्त होत चाललेल्या आदिवासी जमातीचे पाडे आहेत. हजारो उंट या वस्तीत खाण्याच्या शोधात शिरत आहेत. दुष्काळामुळे पाणी, अन्नाचं दुर्भिक्ष्य आहे, त्यामुळे स्थानिकांनाच प्राथमिक गरजा भागवता येत नाही, अशातच उंटाचे कळप पाड्यात शिरून गोंधळ माजवत आहेत. या पाड्यात अडीच हजार लोक राहतात. 

पाण्याच्या शोधात हे उंट  वस्तीवर येत आहेत. पाण्याचे, खाद्याचे साठे उद्धवस्त करत आहेत. त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक ठिकाणी भीषण दुष्काळ पडला. त्यातून वणव्यामुळे अधिकाधिक जंगल जळून खाक झालं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर खूप मोठं संकट ओढावलं आहे. ऑस्ट्रेलियानं एकूण दहा हजार उंटानां ठार करण्याचा निर्णय घेतला आहे, गेल्या पाच दिवसांत पाच हजार उंटानां ठार करण्यात आलं आहे. 

बजाजची इलेक्ट्रिक चेतक : रिव्हर्स गिअर, घरातच चार्ज करता येणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:5000 camels in a five day cull of feral herds that were threatening indigenous communities