पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमधील ५० हजार बंद मंदिरं पुन्हा उघडणार, सरकारची तयारी सुरु

काश्मीरमधील ५० हजार बंद मंदिर पुन्हा उघडणार, सरकारची तयारी सुरु

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारने आता खोऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले मंदिरं उघडण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सरकार काश्मीर खोऱ्यातील बंद असलेल्या मंदिरांचा सर्व्हे करत असल्याचे सोमवारी सांगितले. 

रेड्डी म्हणाले की, आम्ही काश्मीर खोऱ्यातील बंद पडलेल्या शाळांच्या सर्व्हेसाठी एक समिती स्थापन केली आहे. या शाळा पुन्हा सुरु केल्या जातील. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून सुमारे ५० हजार मंदिर बंद झाले आहेत. त्यातील काही नष्ट झाले होते आणि काहींच्या मूर्ती भंग पावल्या आहेत. आम्ही अशा मंदिरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. 

नागरिकांसाठी बहुपयोगी ओळखपत्र तयार करणे शक्य - अमित शहा

दरम्यान, ९० च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे सत्र सुरु झाल्यानंतर लाखोंच्या संख्येने काश्मिरी पंडितांना नाईलाजाने काश्मीर खोरे सोडून जावे लागले होते. दहशतवाद्यांनी मोठ्या संख्येने काश्मिरी पंडितांच्या हत्या केल्या होत्या. मंदिरांचेही त्यांनी मोठे नुकसान केले होते. त्यानंतर अनेक मंदिर बंद झाले. यामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरांचा समावेश आहे. शोपियानमध्ये विष्णु मंदिर आहे. पहलगाममध्येही महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, जे सध्या बंद अवस्थेत आहे.