पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतातून बेकायदा पद्धतीने बांगलादेशला निघालेल्यांची संख्या ५० टक्क्याने वाढली

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी (प्रातिनिधिक छायाचित्र)

बेकायदा पद्धतीने भारताकडून बांगलादेशमध्ये निघालेल्या स्थलांतरितांची संख्या २०१८ मध्ये ५० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या सर्वांना अटक केली. २०१८ मध्ये ही संख्या २९७१ इतकी होती तर २०१७ मध्ये ती १८०० होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे. बेकायदा पद्धतीने स्थलांतर करताना अटक करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेशही जास्त आहे.

प्रकाश आंबेडकरांची 'ती' भूमिका निषेधार्ह, रामदास आठवलेंची टीका

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये बेकायदा पद्धतीने बांगलादेशकडे निघालेल्या आणि अटक करण्यात आलेल्या स्थलांतरितांची संख्या २९७१ होती. यामध्ये १५३२ पुरुष, ७४९ महिला आणि ६९० लहान मुलांचा समावेश होता. 

एकीकडे भारतातून बांगलादेशकडे निघालेल्या स्थलांतरितांची संख्या २०१८ मध्ये वाढली असताना दुसरीकडे बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या घुसखोरांची संख्या कमी झाली आहे. २०१८ वर्षामध्ये १११८ स्थलांतरितांनी बांगलादेशमधून भारतात बेकायदा पद्धतीने प्रवेश केला. त्याच्या आधीच्या वर्षात हाच आकडा ११८० इतका होता. 

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, ... या नावावर शिक्कामोर्तब

बेकायदा पद्धतीने घुसखोरी करणाऱ्यांचा नक्की हेतू काय होता, याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिलेली नाही. पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील सीमांच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे.