पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये भाविकांच्या कारला भीषण अपघात; ५ ठार ९ जखमी

आंबेनळी घाटात एसटी बसला अपघात

राजस्थानमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सिरोह जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्व प्रवासी अहमदाबादवरुन जैसलमेर येथे देवदर्शनासाठी जात होते.

आता रडायचं नाही तर लढायचं; उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २७ वर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला आहे. सिरोहीजवळील भिमाना गावाजवळ भरधाव कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. कार चालवत असताना अचानक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व जण अहमदाबादच्या जैसलमेर येथील रामदेवराचे दर्शन करण्यासाठी जात होते. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. 

शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊः नवाब मलिक

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारमधून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींवर आबूरोड येथील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर घटनास्थळी तिघांचा मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. 

गोमांस खाणाऱ्यांनी कुत्र्याचं मांसही खावं: भाजप नेता