पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये रेल्वेने दिली बैलगाडीला धडक; ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश अपघात

बिहारच्या समस्तीपूरमध्ये गुरुवारी रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. रेल्वे आणि बैलगाडीच्या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. समस्तीपूर-खगडिया रेल्वे स्थानका दरम्यान हा अपघात झाला आहे.

२४ तासांत वाडिया रुग्णालयाला निधी उपलब्ध करुन द्या: हायकोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, सलौनवरुन समस्तीपूर येथे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने हसनपूर रेल्वे स्थानकाजवळ बैलगाडीला धडक दिली. या अपघातामध्ये बैलगाडीमध्ये असलेल्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. 

गुंडाला महामंडळावर घेणाऱ्यांनी बोलूच नये, थोरातांचा फडणवीसांना

अपघाताची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. महुआ ढालाजवळ मानव रहित क्रॉसिंग आहे. रेल्वेला न पाहता बैलगाडीतून काही तरुण जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या रेल्वेने बैलगाडीला धडक दिली. 

यापुढे असे विधान खपवून घेणार नाही; बाळासाहेब थोरातांचा इशारा