पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या कोची वैद्यकीय महाविद्यालयातील दृष्य (PTI Photo )

केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ३९ पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी कोरोनाच्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील एका कुटुंबातील तीन लोक इटलीहून परतले होते आणि इतर दोन नातेवाईक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाल्याचेही शैलजा यांनी सांगितले. 

बॉम्बस्फोटात हात गमावलेल्या मालविकांना मोदींनी दिला हा मान

आरोग्य मंत्री शैलजा म्हणाल्या की, कोरोना संक्रमित रुग्णांनी कोणा-कोणाची भेट घेतली याचा आम्ही शोध घेत आहोत. आता दुसऱ्या देशातून आलेल्या नागरिकांना जबाबदारीने वागले पाहिजे. भारतात येताच त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. 

केरळमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित तीन प्रकरणांना दुजोरा मिळाला होता. या रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. 

मुस्लिम आरक्षणावर उद्धव ठाकरे गप्प का, भाजपचा सवाल

कोरोना विषाणूने आणखी दोन राज्यात पाय पसरले. शनिवारी लडाखमध्ये या विषाणूने ग्रस्त दोघे सापडले तर तामिळनाडूमध्येही याने शिरकाव केला आहे.