पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाटण्यामध्ये घरात स्फोट, पाच जण जखमी

पाटण्यामध्ये एका घरात सोमवारी सकाळी स्फोट झाला.

बिहारची राजधानी पाटणामध्ये सोमवारी सकाळी एका घरामध्ये स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटामध्ये ५ ते ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाटण्यातील गांधी मैदान परिसरातील दलदली रोडवर असलेल्या एका घरामध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर या घराचे मोठे नुकसान झाले. स्फोटामुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण होते.

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

घरातील गॅस सिलिंडरचा स्फोटामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये कोणताही संशयास्पद प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींना पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरामध्ये भाड्याने एक कुटूंब राहात होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे घरमालकाने सांगितले. हा स्फोट इतका मोठा होता की या घराच्या आजूबाजूला असलेल्या अन्य ३ घरांचे नुकसान झाले आहे. 

विदर्भातील ६० टक्के शेतकऱ्यांना मानसिक आजार, सर्वेक्षणाचे निष्कर्ष

स्फोटामुळे घराचे छत उडून गेले असून, भिंतीही पडल्या आहेत, असे घरमालकाने सांगितले.