पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्या बाकांवरील हे पाच चेहरे नव्या लोकसभेत दिसणार नाहीत, काय बदल होणार वाचा....

संसद भवन

येत्या काही दिवसातच १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात सर्व सदस्यांना शपथ दिली जाईल. त्याचबरोबर लोकसभेचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पण यावेळच्या लोकसभेमध्ये काही चेहरे दिसणार नाहीत. निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे किंवा निवडणूकच न लढल्यामुळे १७ व्या लोकसभेत पाच प्रमुख चेहरे दिसणार नाहीत. आता हे कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे चेहरे आहेत... माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, सोळाव्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अण्णा द्रमुकचे नेते आणि गेल्या लोकसभेतील उपाध्यक्ष एम. थंबीदुराई. 

खातेवाटप जाहीर: अमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते

सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांनी लोकसभेची निवडणूक लढविली नव्हती. तर अन्य सर्वांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. हे खासदार लोकसभेमध्ये कायम पहिल्या बाकांवर बसलेले दिसायचे पण आता ते लोकसभेमध्ये नसल्यामुळे या जागांवर कोण पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला असलेल्या पहिल्या रांगेतील पहिले आसन हे पंतप्रधानांसाठी राखीव असते. त्यांच्या शेजारचे आसन मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्र्यासाठी असते. गेल्या लोकसभेमध्ये या जागेवर राजनाथ सिंह बसत होते. त्यानंतरच्या आसनांवर वरिष्ठ मंत्री किंवा ज्येष्ठ सदस्य बसतात. यावेळी या जागांवर अमित शहा, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांना बसण्याची संधी मिळू शकते.

लोकसभेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वेगवेगळ्या पक्षाच्या गटनेत्यांना किंवा ज्येष्ठ खासदारांना लोकसभेत पहिल्या रांगेमध्ये बसण्याची संधी मिळते. जर माजी पंतप्रधान पुन्हा लोकसभेत निवडून आले तर त्यांना सुद्धा पहिल्या रांगात जागा देण्याचे संकेत आहेत. एखाद्या पक्षाचे लोकसभेत किती खासदार निवडून आले आहेत. यावर त्यांना पहिल्या रांगेत किती जागा मिळणार हे अवलंबून असते. 

पुढील १० वर्षे 'कपालभाती' करा, रामदेवबाबांचा विरोधकांना सल्ला

गेल्या लोकसभेमध्ये बिजू जनता दलाचे भात्रुहारी मेहताब आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांना पहिल्या रांगेत जागा देण्यात आली होती. पण यावेळच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या जागा गेल्यावेळेपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही पहिल्या रांगेतील जागा गमवावी लागणार आहे.