कर्नाटकमध्ये बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Karnataka: 5 dead & 15 Injured after a bus overturned near Koratagere in Tumkur, earlier today. pic.twitter.com/vTI1SfCvdF
— ANI (@ANI) October 30, 2019
आमदार विनय कोरे,चंद्रपूरचे जोरगेवार यांचा भाजपला पाठिंबा
कर्नाकच्या तुमकूर जिल्ह्यातल्या कोराटागेरे गावानजीक हा अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी कर्नाटकच्या दिशेने जाणारी ही बस पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात हलवले. तर अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.