पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आंध्र प्रदेशः गोदावरी नदीत बोट बुडाली, ११ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील देवीपट्टनम जवळ असलेल्या गोदावरी नदीत रविवारी दुपारी बोट बुडाली (PTI PHOTO.)

आंध्र प्रदेशमधील देवीपट्टनम जवळ असलेल्या गोदावरी नदीत रविवारी दुपारी बोट बुडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत कर्मचाऱ्यांसह ६२ लोक प्रवास करत होते. पूर्व गोदावरीचे पोलिस अधिक्षक अदनान नईम यांनी या घटनेनंतर २४ लोकांना वाचवण्यात यश आले असून अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले. या बोटीतील बहुतांश लोक हे पर्यटक असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, २००० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

मदत आणि पूनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन एनडीआरएफची पथके पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात ३० सदस्य आहेत. 

रॉयल वशिष्ट असे बुडालेल्या बोटीचे नाव आहे. या बोटीवरील बहुतांश लोक हे पर्यटक होते. हे सर्वजण पापीकोंडलू येथे जात होते. राजामुंद्रीजवळील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

RSS प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच विदेशी माध्यमांशी साधणार संवाद

मदतीसाठी एक हेलिकॉप्टरही रवाना झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर आला आहे.