जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. रविवारी रात्री दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले आहेत. तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. कुपवाड्यातील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ ही चकमक झाली.
Five soldiers killed as Army foils infiltration attempt from PoK; 5 militants gunned down: Officials
— Press Trust of India (@PTI_News) April 5, 2020
पंतप्रधान मोदींचे आवाहन, दिव्यांनी उजळला देश
मिळालेल्या माहितीनुसार, केरन सेक्टरच्या नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती जवानाना मिळाली होती. या माहितीच्या आधारेच जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना अडवले असता चकमकीला सुरुवात झाली. यावेळी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले.
९ वाजून, ९ मिनिट; पंतप्रधान मोदींनीही प्रज्वलित केले दिवे
श्रीनगर येथील सुरक्षा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान झालेल्या या चमकीत ५ दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर, या चकमकीत सुरुवातीला एक जवान शहीद झाला तर ४ जवान गंभीर जखमी झाले होते. जखमी जवानांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चारही जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.