पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली वकील हत्या प्रकरणी 5 जणांना अटक; मोलकरणीने रचला हत्येचा कट

वकील हत्या प्रकरणातील आरोपी

दिल्लीतील महिला वकील हत्या प्रकरणातील आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नोएडा पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि पैशासाठी ही हत्या केली असल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. नोएडा येथील सेक्टर 31 मध्ये राहणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील कुलजीत कौर यांची 1 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. कुलजीत यांनी नेपाळ येथे राहणाऱ्या मनिषाला घरकामासाठी ठेवले होते. मनिषाने तिच्या साथिदारांच्या मदतीने त्यांची गळा दाबून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी कुलजीत यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि होंडा सिटी कार घेऊन फरार झाले होते. 

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

याप्रकरणी पोलिसांनी धनबहादुर उर्फ संजू शाही, कपिल उर्फ पंडित सत्य नारायण शर्मा, रीता, ललित उर्फ चंद्र प्रसादसह 5 जणांना अटक केली. आरोपीमध्ये एका अल्पवयिन मुलीचा देखील समावेश आहे. आरोपींनी तब्बल 3 कोटींचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी, कुलजीत यांचे दोन मोबाईल, तीन चेकबुक, कुलजीत यांची होंडासिटी कारची चावी, एक लॅपटॉप, त्यांचे दागिने ऐवढा ऐवज पोलिसांनी जप्त केलाआहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनिषा फरार असून तिचा शोध सुरु आहे. कुलजीत यांच्या हत्येचा कट त्याच्या घरामध्ये पूर्वी काम केलेल्या मोलकरणीच्या सांगण्यावरुन रचला गेला होता हे तपासामधून उघड झाले आहे.

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

कुलजीत यांच्या घरामध्ये नेपाळची रीता गेल्या दोन वर्षापासून काम करत होती. रीता पती चंद्रप्रसाद आणि मुलासोबत त्यांच्याच घरामध्ये राहत होती. मात्र 4 महिन्यापूर्वी तीने काम सोडले. काम सोडल्यानंतर रीताने तिच्या साथिदारांना सांगितले होते की, कुलजीत यांना वारस नाही. तसंच त्यांच्या घरामध्ये कोट्यवधी रुपये आहेत. लूट करण्याच्या उद्देशानेच रीताने तिची मैत्रिण मनिषाला कुलजीत यांच्या घरी कामासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी हत्येचा कट रचला. कुलजीत यांना चहामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे त्यांचा मृत्यू न झाल्यामुळे तिघांची गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर ते दागिणे घेऊन फरार झाले होते.

जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात