पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित ४६ रुग्ण आढळले, तिघांचा मृत्यू

कोरोना विषाणू

ज्या चीनमधून कोरोना विषाणू संक्रमणाची सुरुवात झाली होती. तिथे पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४६ रुग्ण आढळून आले आहेत. चीनमधील वुहानमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव झाला होता. विशेष म्हणजे चीनमध्ये या आजारामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला. घरातून या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

भारत अमेरिकेसह या १३ राष्ट्रांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यास 'राजी'

चीनमध्ये आढळलेल्या ४६ नव्या रुग्णांपैकी ३४ जण असे आहेत की त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. पण त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. चीनमध्ये परदेशातून आलेल्या आणि कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता ११८३ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी ४४९ जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७३४ लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

लॉकडाऊन : गुजरातमध्ये स्थलांतरित कामगारांकडून हिंसाचार

चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची एकूण संख्या शुक्रवारपर्यंत ८१९५३ पर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यापैकी १०८९ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. ७७५२५ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ३३३९ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.