पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

नौशेरात दहशतवाद्यांबरोबर चकमक, एक भारतीय अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. कुलगामच्या गुदर भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला घेराव घातला असून चकमक सुरुच आहे. 

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजार पार, ८७२ रुग्णांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील गुदर भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता चकमकीला सुरु झाली. यावेळी जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अद्यापही चकमक सुरु आहे. 

तबलिगी जमातीबाबत मोहन भागवत म्हणाले...

याआधी देखील कुलगाम जिल्ह्यामध्ये जवानांना मोठे यश मिळाले होते. कुलगाम जिल्ह्यातील गुदर भागामध्ये रविवारी संध्याकाळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. या चकमकीत एक मेजर जखमी झाला. 

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:4 terrorists have been killed in the encounter between personnel of indian army and terrorist