पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरात नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोटात लेफ्टनंटसह चार जवान जखमी

भारतीय जवान गस्त घालताना

जम्मू-काश्मीरमध्ये भूसुरुंग स्फोटात लष्कराचा लेफ्टनंट दर्जाचा अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात ही घटना घडली. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संजय राऊतांनी नाव न घेता काँग्रेसला फटकारले

नौशेरामध्ये कलाल या ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या जवानांकडून गस्त घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळीच हा भूसुरूंग स्फोट झाला. ज्यामध्ये लेफ्टनंट दर्जाचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तपासही सुरू करण्यात आला आहे. 

केवळ सत्तेसाठी सर्व संधीसाधू एकत्र - गडकरी

काही दिवसांपूर्वीच नौशेरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. पाकिस्तानकडून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत असताना ही घटना घडली होती.