पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपत

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपत (Vipin Kumar/ HT Photo)

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेत तेलगू देशम पार्टीच्या (टीडीपी) चार खासदारांनी राजीनामा देत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील वाय एस चौधरी, सी एम रमेश, टी जी व्यंकटेश हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपत सहभागी झाले. खासदार जी एम राव औपचारिकरित्या भाजपत नंतर येतील. त्यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येते. 

राज्यसभेत सहा खासदार असलेल्या टीडीपीचा वेगळा गट बनवणाऱ्या चार सदस्यांनी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यसभेचे सभापती वाय एस चौधरी, सी एम रमेश, टी जी व्यंकटेश आणि जी एम राव यांनी आज भाजपबरोबर टीडीपीचे विधानमंडळ गट विलय करण्याचा प्रस्ताव संमत केला. 

उल्लेखनीय म्हणजे या चार खासदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे राज्यसभेत बहुमतासाठी झगडत असलेल्या भाजपला दिलासा मिळाला आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएकडे सध्या राज्यसभेत बहुमत नाही. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपीचे राज्यसभेत सहा खासदार आहेत. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार एखादा पक्ष सोडून वेगळ्या झालेल्या गटाला तेव्हाच मान्यता मिळते. जेव्हा त्यांचे दोन तृतीयांश सदस्य या गटात सामील होतील. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही २४५ आहे. यात सर्वाधिक ७१ सदस्य हे भाजपचे आहेत.