पाकिस्तानमधील लाहोर शहर स्फोटाने हादरुन गेले. लाहोर येथील दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या सुफी दर्गापैकी एक असलेल्या दाता दरबारबाहेर आज (बुधवारी) स्फोट झाला. यात आठ जण ठार तर २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त एएनआयने जिओ न्यूजच्या हवाल्याने दिले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. हल्ल्याबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.
Geo News: 'Three police officials martyred in Lahore blast outside Data Darbar shrine, 18 people injured,' hospital sources. https://t.co/vDSBTPoM72
— ANI (@ANI) May 8, 2019
एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांच्या निशाण्यावर पोलिसांची गाडी होती. हा आत्मघातकी हल्ला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेच्या ठिकाणी मदत कार्य सुरु आहे. सुरुवातीला आलेल्या वृत्तानुसार पोलिसांचे एलिट फोर्स निशाण्यावर होते.