पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA : दिल्लीतील हिंसक आंदोलनात चौघांचा मृत्यू

सीएएविरोधातील अंदोलनाला हिंसक वळण

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. कायद्याच्या विरोधात आणि कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या दोन गटातील दगडफेकीच्या प्रकारानंतर आंदोलन चिघळले असून यात एका हेडकॉन्स्टेबलसह तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. अनेक जण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

हिंसाचाराच्या घटनांमुळे इशान्य दिल्लीतील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मंगळवारी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा देखील रद्द करण्याची विनंती राज्याचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली आहे. बारावीचा उद्या पेपर असला तरी कोणतेही केंद्र आंदोलन सुरु असलेल्या भागत नसल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

सीबीएसईच्या जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी केवळ बारावीची परीक्षा असून ही परीक्षा पश्चिम दिल्लीमधील १८ केंद्रावर घेण्यात येणार आहे. आंदोलन सुरु असलेल्या परीसरात उद्याच्या परीक्षेसाठी कोणतेही केंद्र नाही.