पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जन्माष्टमी साजरी करताना मंदिराची भिंत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

मंदिराची भिंत कोसळून जखमी झाले

पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मंदिराची भिंत कोसळून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले आहेत. ही घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यामध्ये घडली आहे. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती. याचवेळी मंदिराची भिंत अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक भाविक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दुर्घटनेत ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विधानसभेसाठी सुप्रिया सुळेंची राज्यभर 'संवाद यात्रा'

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परगनाच्या काचुआ परिसरामध्ये असलेल्या मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यात येत होती. त्याच दरम्यान, मंदिराची भिंत कोसळून भाविकांच्या अंगावर पडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाविकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित भाविकांच्या मदतीने त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दरम्यान, जखमी झालेल्या २७ भाविकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जखमींना ताबडतोब उपचार देण्याचे आदेश दिले. तर सरकारने या दुर्घटनेतील मृतकांच्या  कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच गंभीर जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

'कितीही चौकशा होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही'