पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयपूरमधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी, एकाची सुटका

जयपूर बॉम्बस्फोट (संग्रहित छायाचित्र)

मे २००८ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या नऊ बॉम्बस्फोटांप्रकरणी न्यायालयाने चौघांना दोषी ठरविले. या चौघांना भारतीय दंडविधान संहितेतील वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना उद्या, गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. सरकारी पक्षाचे वकील श्रीचंद यांनी ही माहिती दिली. जयपूरमधील न्यायालयाने एकाची निर्दोष सुटका केली.

अक्षय कुमार याचा अमित शहांना महत्त्वाचा सल्ला

जयपूरमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या संघटनेच्या वतीने मेल पाठविण्याचे काम शाहबाज हुसेन ऊर्फ शाहबाज अहमद ऊर्फ शानू याने केले होते. त्याची न्यायालयाने सुटका केली. या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सर्वात आधी त्याला अटक केली होती. तो बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा सदस्य होता.

श्रीचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सैफ (३२), मोहम्मद सरवार (३६), सैफ उर रेहमान (३६) आणि सलमान (३४) यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, धोकादायक तीक्ष्ण शस्त्रांचा वापर करून जखमी करणे, कट रचणे, बेकायदा कृत्ये या सर्व कलमांखाली न्यायालयाने या चौघांना दोषी ठरविले. 

निर्भया प्रकरण: दोषी अक्षयची फाशी कायम, पुनर्विचार याचिका फेटाळली

आरोपींनी मे २००८ जयपूरमध्ये सायकलवर नऊ बॉम्ब ठेवले होते. संध्याकाळी ७.२० ते ७.४५ या २५ मिनिटांच्या कालावधीत या सर्व बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ७१ लोक मृत्युमुखी पडले होते.