पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले, ४ जण अटकेत

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले

पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकणाऱ्या चार नराधमांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. २७ वर्षीय महिला  पशुवैद्यकीय डॉक्टरचा अर्धवट जळालेला मृतदेह हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर शाहनगर येथे आढळून आला होता. 

 पीडित महिला रात्री दुचाकीवरून घरी जात असताना तिची दुचाकी पंक्चर झाली  त्यानंतर आरोपींनी ती एकटी असल्याचं पाहून तिला मदत करण्याची तयारी दर्शवली, मात्र या नराधमांनी  टोल प्लाझापासून तिला दूर नेत हे कृत्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'या'मुळे काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसली

या प्रकरणात दोन लॉरी चालक आणि त्यांच्या मदतनीसांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चौघांनी तिच्या दुचाकीचं टायर आधी पंक्चर केलं आणि मदतीच्या बहाण्यानं तिला टोल प्लाझापासून ओढत लांब नेलं. त्यानंतर गुरुवारी सकाळी टोल नाक्यापासून २५ किलोमीटर दूर  अर्धवट जळालेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह एका व्यक्तीला आढळला. त्यांनी पोलिसांना यासंबधीची माहिती दिली. 

पीडित महिला बेपत्ता होण्यापूर्वी तिनं आपल्या बहिणीला फोन केला होता. टायर पंक्चर झालं असून काही माणसं मदत करण्याच्या बहाण्यानं आपल्याभोवती जमली आहेत त्यांची खूपच भीती वाटत असल्याची माहिती  तिनं बहिणीला दिली होती. कुटुंबीयांनी तत्काळ टोल प्लाझानजीक धाव घेऊन तिची शोधाशोध सुरू केली मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. 

CM उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन केली लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोंपीपैकी तीन आरोपी हे २० वर्षांचे आहेत तर एकाचं वय हे २६ आहेत. हे चारही आरोपी तेलंगणामधले आहेत.