पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत १३ जणांनी गमावला जीव

दिल्लीत हिंसक आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका पोलिसासह नागरिकांचा समावेश आहे. या हिंसाचारामध्ये १३० हून अधिकजण जखमी झाल्याचा प्राथमिक आकडा समोर आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राजघाटवर जाऊन शांतता प्रस्थापितकरण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले की, मागील दोन दिवसांत दिल्लीतील हिंसक आंदोलन देशाची चिंता वाढवणारे आहे. राजघाटवर अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता गांधीजींना प्रार्थना करुन त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. 

मुंबई : मरिन ड्राइव्ह परिसरातून रात्री उशीरा आंदोलक ताब्यात

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चार मृतदेहांच्या शरीरावर  गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत, तर दगडफेकीत गंभीर इजा होऊन  हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयात हिसांचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत. उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या जखमींच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

रुग्णालयातील सुत्रांच्या माहितीनुसार गोळी लागल्यानं एकूण १५ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशीरापर्यंत ९३ जखमींना  उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात आले, मात्र जखमींमधील गंभीर असलेल्या रुग्णांचा आकडा सांगण्यास डॉक्टरांनी नकार दिला. हिंसाचाराच्या घटनांमुळे इशान्य दिल्लीतील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मंगळवारी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा देखील रद्द करण्याची विनंती राज्याचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली होती. 

...म्हणून काँग्रेस नेत्यांनी दिला ट्रम्प यांच्यासोबतच्या डिनरला नकार