पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड, इस्रो प्रमुखांची माहिती

के सिवन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो)  गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी बुधवारी सांगितले. हे सर्व अंतराळवीर भारतीय हवाई दलातून निवडण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'जनतेने सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन घरी पाठवले पाहिजे'

गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारताकडून पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठविण्यात येणार आहे. २०२२ मध्ये गगनयान मोहिम प्रत्यक्षात येणार आहे. के. सिवन म्हणाले, गगनयान मोहिमेसंदर्भात आम्ही २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मोहिमेचे अनेक डिझाईन्स तयार झाले आहेत. या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येईल. 

गगनयान मोहिमेच्या अंतिम प्रक्षेपणापूर्वी अनेक चाचण्या करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर या मोहिमेतील सहभागी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करण्याचे कामही करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रोसाठी २०२० अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. याच वर्षात चांद्रयान-३ मोहिम आखण्यात आली असून, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. जीसॅट २० हा उपग्रहही याच वर्षात अवकाशात झेपावणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले. 

जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय आहे: संग्राम थोपटे

२०२० मधील इस्रोच्या वेगवेगळ्या अंतराळ मोहिमांसाठी केंद्र सरकारकडे १४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.