दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा कंटेनर बल्गेरियातून आल्याचे सांगितले जात आहे. एसेक्स पोलिसांनी लंडन जवळील ग्रेज येथील एका इंडस्ट्रियल पार्कमध्ये बुधवारी हा कंटेनर ताब्यात घेतला. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये एका अल्पवयीन मृतदेहाचा समावेश आहे. याप्रकरणी पूर्व आर्यलंड येथून एका २५ वर्षीय युवकाला अटक करण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ
एसेक्स पोलिस प्रमुख अँड्रयू मॅरिनर यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले की, हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. यामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे. या लोकांशी वास्तवात काय झाले, याचा आम्ही शोध घेत आहोत. पोलिसांनी सांगितले की त्यांना स्थानिक वेळेनुसार रात्री १.४० वाजता अॅम्ब्यूलन्स सर्व्हिसने त्यांनी वॉटरग्लेड इंडस्ट्रियल पार्कजवळ मृतदेहांनी खचाखच भरलेला एक कंटेनर आढळून आल्याचे सांगितले.
BSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी
मॅरिनर म्हणाले की, आम्ही मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत आहोत. पण याला खूप वेळ लागेल असे वाटते. हा कंटेनर बल्गेरियातून आल्याचा आम्हाला संशय आहे. हा कंटेनर शनिवारी ब्रिटनच्या हॉलिलँडच्या रस्त्याने आला असेल. याप्रकरणी आम्ही कंटेनर चालकाला अटक केली आहे. चौकशी होईपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात येईल.