पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रतुल पुरी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीला १४ दिवसांची न्यालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज त्याला दिल्लीच्या रॉउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावत त्याची रवानगी तिहार कारागृहात केली आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपर्यंत रतुल पुरीला तिहार कारागृहात रहावे लागणार आहे. याप्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा करत आहेत. 

चिदंबरम यांना दिलासा, तिहार तुरुंगात जाणे तूर्त टळले

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मॉजर बेअर कंपनीचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला २० ऑगस्ट रोजी ईडीने अटक केली होती. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रतुल पुरी आणि ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याबाबत तक्रार दाखल केली होती. 

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

रतुल पुरीने २०१२ मध्ये मोजर बेयर कंपनीच्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. तर त्याचे वडील दीपक पुरी आणि आई नीता पुरी अजूनही या कंपनीच्या बोर्डामध्ये आहेत. सीबीआयने दीपक पुरी, नीता पुरी यांच्या व्यतिरिक्त मोजर बेयर कंपनीशी संबंधित संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. 

काश्मीरमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय