पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी; ३५ जण ठार

ईराणी कमांडर कासिम सुलेमानी

अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात ठार झालेला इराणी कमांडर कासिम सुलेमानी याच्या अंत्ययात्रे दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

इराणमधील एका सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कमांडर कासिम सुलेमानी याचा मृतदेह त्याचे मुळगाव करमान येथे दफन करण्यात आला. त्यापूर्वी राजधानी तेहरान येथे अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यामध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकं सहभागी झाले होते. या अंत्ययात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि एकच खळबळ उडाली. या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या ४८ लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

इराणने अमेरिकन सैन्याला 'दहशतवादी' घोषित केले

इराकची राजधानी बगदादमधील विमानतळावर अमेरिकेने रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. इराक आणि इराणच्या अनेक टॉप कमांडरचा यामध्ये मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी, इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांडिससह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आपण कासिम सुलेमानी यांना मारण्याचे आदेश दिले होते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. 

VIDEO: नव्या आव्हानांची शमी अशी करतोय तयारी