पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत पाठवले

विमानातून दिल्ली विमानतळावर उतरत असलेले प्रवासी

मेक्सिकोमध्ये व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याचा आरोप असलेल्या ३११ भारतीय नागरिकांना विमानाने नवी दिल्लीला परत पाठविण्यात आले. हे सर्व नागरिक नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी पाच वाजता पोहोचले आहेत. ३११ नागरिकांमध्ये ३१० पुरुष आहेत तर एक महिला आहे.

सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी

मेक्सिकोमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. भारतीयांना घेऊन आलेले विमान दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतर बराच वेळ या प्रवाशांना विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचे भारतातील आगमनाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यासाठी विविध सरकारी संस्था एकत्रितपणे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. 

या प्रवाशांचे काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये हे प्रवासी विमानातून बाहेर येताना दिसतात. यापैकी जवळपास कोणत्याच प्रवाशाकडे कोणत्याही बॅगा वगैरे काही नाहीत. नेसत्या कपड्यावर त्यांना भारतात पाठवून देण्यात आले आहे.

सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस

मेक्सिकोतून विमानातून इतक्या दूरच्या देशात अशा पद्धतीने नागरिकांना परत पाठविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे त्या देशाने म्हटले आहे.