पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, टीएमसीच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, टीएमसीच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेल्या राजकीय हत्यांची मालिका संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. शुक्रवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार आणि बॉम्ब फेकून हत्या केली आहे. मृत कार्यकर्त्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. खैरुद्दीन शेख आणि सोहेल राणा अशी त्यांची नावे आहेत. टीएमसीने एका कार्यकर्त्याच्या हत्येसाठी काँग्रेस आणि दोघांच्या हत्येसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. 

'बंगालमध्ये राहायचे असेल तर बांगला बोलावेच लागेल'

मुर्शिदाबाद येथे अज्ञात लोकांनी टीएमसीचे कार्यकर्ते खैरुद्दीन शेख आणि सोहेल राणाच्या घरात बॉम्ब फेकला. त्यात या दोघांचा मृत्यू झाला. दोन मृतांच्या नातेवाईकांनी हत्येसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. 

तत्पूर्वी, उत्तर २४ परगणा जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका महिला भाजप कार्यकर्तीची हत्या झाली होती. सरस्वती दास (४२) असे मृत महिला कार्यकर्तीचे नाव आहे. त्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हन्नीबल येथील अमलानी ग्रामपंचायतमध्ये सक्रीय कार्यकर्त्या होत्या. भाजप नेत्यांनी या हत्येला टीएमसीला जबाबदार ठरवले आहे.

पश्चिम बंगालःभाजपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराचाही वापर