पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते श्रीनगरकडे

सीमेवर गस्त घालताना सीमा सुरक्षा दलाचे जवान

जम्मूमध्ये नागरोटाजवळ टोलनाक्यावर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात शुक्रवारी यश मिळाले. हे तिन्ही दहशतवादी एका ट्रकमधून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी ही चकमक झाली. या घटनेत एक पोलिस जखमी झाला आहे.

कोरोना आंतरराष्ट्रीय आपत्ती, WHO कडून विशेष काळजी घेण्याची सूचना

जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावर हा ट्रक सुरक्षा तपासणीसाठी थांबविण्यात आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार सुरू करण्यात आला. त्याला पोलिस आणि इतर सुरक्षारक्षकांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. घटनास्थळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले. इतर दहशतवादी चकमकीमध्ये जंगलाच्या दिशेने पळाले. त्यापैकी दोघांना ठार मारण्यात यश आले आहे. या दोघांचे मृतदेह जंगलातून महामार्गावर आणण्यात आले आहेत. जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली.

दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी ट्रकमध्ये चार ते पाच दहशतवादी असण्याची शक्यता आहे. या सर्वांनी कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधून भारतात घुसखोरी केली असण्याची शक्यता आहे.

ओलीस ठेवलेल्या आरोपीच्या पत्नीला जमावाकडून जबर मारहाण, अखेर मृत्यू

चकमकीत जखमी झालेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमधून पोलिसांनी एके ४७ रायफल्स, जिवंत काडतुसे, ग्रेनेड जप्त केले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सर्व दहशतवादी परदेशी असावेत आणि त्यांना स्थानिकांनी मदत केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.