पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत रबर फॅक्ट्रीला आग; ३ जणांचा मृत्यू

रबर फॅक्ट्रीला आग

दिल्लीमध्ये आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शनिवारी सकाळी पूर्व दिल्लीच्या झिलमिल भागामध्ये रबर फॅक्ट्रीला भीषण आग लागली.  फ्रेंड्स कॉलोनी इंडस्ट्रियल भागामध्ये असलेल्या रबर फॅक्ट्रीला अचानक आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २६ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आग लागलेल्या रबर फॅक्ट्रीमधून दोन महिला आणि एका तरुणाला बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखमी झालेले तिन्ही जण धुरामुळे बेशुध्द पडले होते. उपचारा दरम्यान तिघांचा देखील मृत्यू झाला आहे. ही रबर फॅक्ट्री नईम या व्यक्तीच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे.

लघुशंकेच्या वादातून शिर्डीत तीन जणांची कोयत्याने हत्या 

एक दिवस आधी दिल्लीच्या बसईदारापूर येथे ईएसआय हॉस्पिटलला शुक्रवारी सकाळी आग लागली होती. हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरम्ये आग लागली होती. या आगीमुळे हॉस्पिटलमध्ये धुराचे साम्राज्य होते. त्यामुळे रुग्णांना श्वसनासाठी त्रास होत होता. अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचण्याआधीच हॉस्पिलमधील कर्मचाऱ्यांनी आग विझवली होती. शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. 

गोव्यात मंत्रीमंडळ पुनर्रचना; ४ नव्या आमदारांचा होणार