पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, बंधकाचीही सुटका

दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक (संग्रहित छायाचित्र)

जम्मू - श्रीनगर महामार्गावर रामबान जिल्ह्यात बटोटे गावामध्ये तीन दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी एका नागरिकाला बंधक बनवले होते. त्यानंतर या ठिकाणी चकमक सुरू झाली होती. जवानांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत होते. या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आणि बंधकाची सुखरूप सुटक करण्यात यश आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. जम्मूचे पोलिस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

गाफील राहू नका, गद्दारी करु नका; उद्धव यांचा कार्यकर्त्यांना इशारा

संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन संशयास्पद दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर बटोटे भागात एका गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला. या गाडीच्या चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडी थांबविली नाही. त्याने गाडी पुढे नेल्यावर लगेचच पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. 

धोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराचे जवान एकत्रितपणे प्रयत्न करत होते. या ठिकाणी सैन्यदलाचा अतिरिक्त फौजफाटा पाठविण्यात आला आहे, असे आनंद यांनी सांगितले होते.