पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 3 CRPF जवान शहीद

भैरमगड परिसरातील केशकुतुल गावाजवळील जंगलात जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवान आणि नक्षलवादी यांच्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले. तर एक जवान जखमी आहे. या चकमकीदरम्यान एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. 

बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड येथे सीआरपीएफच्या १९९ बटालियनची तुकडी गस्तीसाठी तैनात करण्यात आली आहे. ही तुकडी केशकुतुल गावाजवळील जंगल परिसरात पोहचल्यानंतर नक्षलवाद्यांकडून जवानांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

यानंतर प्रत्युत्तरात जवानांकडून नक्षलवाद्यांवर गोळीबार करण्यात आला. दरम्यान नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. यात गंभीर जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.