पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केला आयईडीचा स्फोट; तिघांचा मृत्यू

नक्षलवाद्यांनी स्फोट केला

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला आहे. रेल्वे मार्गाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पेट्रोलच्या टँकरला नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने उडवून दिले. या स्फोटामध्ये टँकरमधील तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.

युतीचे जागावाटप हे भारत-पाक फाळणी इतके क्लिष्टः संजय राऊत

मिळालेल्या माहितीनुसार, अंतागडच्या ताडोकी भागामध्ये रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी पेट्रोलचा टँकर घटनास्थळी उभा होता. नक्षलवाद्यांनी पेट्रोल टँकरला आयईडीच्या सहाय्याने उडवून दिला. तर दुसऱ्या डिझेलच्या टँकरला ताब्यात घेतले. या स्फोटामध्ये टँकरमध्ये असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. स्फोटातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध: बँकेचे सर्व व्यवहार ठप्प