पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Corona virus: एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून ३२३ भारतीय दिल्लीत दाखल

Corona virus: एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून ३२३ भारतीय दिल्लीत दाखल

भारताने कोरोना विषाणूमुळे प्रभावित असलेल्या वुहान शहरातून रविवारी ३२३ भारतीय आणि मालदिवच्या ७ नागरिकांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून दिल्लीत आणले. त्याचबरोबर चीनमधून भारतात आणणाऱ्यांची संख्या ६५४ इतकी झाली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे ३०४ जणांचा मृत्यू तर १४३८० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. 

केरळमध्ये आढळला 'कोरोना'चा आणखी एक रुग्ण

चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी याबाबत टि्वट केले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने वुहान येथून ३२३ भारतीय आणि मालदिवच्या ७ नागरिकांना घेऊन उड्डाण केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालय आणि हुबेई येथील स्थानिक अधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार.

त्यांनी दुसऱ्या एका टि्वटमध्ये म्हटले की, मी बीजिंगमध्ये भारतीय दुतावास, हुबेई प्रांताचे स्थानिक अधिकारी आणि प्रवाशांचेही आभार मानतो कारण त्यांनी सुमारे ९६ तासांपर्यंत आव्हानात्मक परिस्थितीत एअरलिफ्ट करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 

सुमारे २५ जण स्वसंमतीने चीनमध्येच थांबले असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. हुबेई प्रांतात अजूनही १०० भारतीय असू शकतात. 

मिस्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, चार भारतीयांच्या अंगात ताप असल्याने ते दुसऱ्या विमानात येऊ शकले नाहीत. वुहान येथून उड्डाण केलेल्या पहिल्या विमानात ३२४ प्रवासी होते. हे विमान शनिवारी सकाळी रवाना झाले होते. पहिल्या विमानात जाण्यास ६ भारतीयांना चीनच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी रोखले होते. कारण या ६ भारतीयांना प्रचंड ताप आला होता.