पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर; आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू

बिहार पूर

बिहारला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे आलेल्या पूराने आतापर्यंत २९ जणांचा बळी घेतला आहे. पावसामुळे बिहारमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. बिहार शहरापासून ते गावापर्यंत सगळीकडे पूराचा फटका बसला आहे. पूराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. रस्त्यांना तर नदीचे स्वरुप आले आहे. ठिकठिकाणी ७ - ८ फूटांपर्यंत पाणी साचले आहे. या पावसामुळे बिहारमधील ९ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर ५ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सीबीआय म्हणजे देव नाही, सुप्रीम कोर्टाने खडसावले

पाटणा शहराला पूराचा मोठा फटका बसला आहे. गावांना पूराने वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक अडकले आहेत.  स्थानिक प्रशासन एनडीआरएफची टीम यांच्याकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. शहरामध्ये एकूण ३६ बोट, ७५ टॅक्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत २६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बिहारमधील अनेक रुग्णालयात पूराचे पाणी शिरल्यामुळे रुग्णसेवेवर परिणान झाला आहे. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.

लालूंच्या घरी 'हाय व्होल्टेज ड्रामा', सुनेचा राबडीदेवींवर छळाचा

बिहारमधील पूराचा कहर पाहता सरकारने केंद्र सरकारकडे बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. पाटणामधील पूरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. तसंच, अतिवृष्टीमुळे बिहारमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन