पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; बस कालव्यात कोसळली, २९ प्रवासी ठार

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात (ANI)

उत्तर प्रदेशमध्ये यमुना एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाला असून यात आतापर्यंत २९ प्रवासी ठार झाला असल्याचे वृत्त आहे. ही बस आग्रा येथील एक्स्प्रेस वेवरील झरना कालव्यात कोसळली. या बसमध्ये ४० जण प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांसह बस कालव्यात कोसळली. हा अपघात पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडला.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, ही बस लखनऊवरुन दिल्लीकडे जात होती. ज्या कालव्यात ही बस पडली, त्या कालवा आणि पुलामध्ये ५० फुटांचे अंतर होते. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. ही अवध डीपीची जनरथ बस होती. यात एकूण ४० जण प्रवास करत होते. हा अपघात एत्मादपूर ठाण्याच्या क्षेत्रात झाल्याचे सांगण्यात येते. हा अपघात पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास झाला. 

चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातावर शोक व्यक्त कर मदतीची घोषणाही केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५-५ लाख रुपये देण्यात येणार आहे.

६ लेनचा यमुना एक्स्प्रेस वे १६५ किमी लांब आहे. हा एक्स्प्रेस वे ग्रेटर नोएडाला आग्राशी जोडतो. २०१२ मध्ये हा एक्स्प्रेस वे तयार करण्यात आला होता.