पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात

जम्मू-काश्मीर जवान

जम्मू- काश्मीरच्या विविध भागामध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 5 दिवसांपूर्वी 10 हजार जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील भाग तसंच काश्मीरच्या खोऱ्यातील इतर भागामध्ये हे जवान गस्त घालणार आहेत. यामध्ये सीआरपीएफचे जास्त जवान आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये  तैनात असलेल्या पोलिसांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात आहेत.   

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा ड्युटीवरील पहिला फोटो व्हायरल

जम्मू-काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एक आठवडा पूर्ण होत नाही तोवरच सरकारने आणखी 28 हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जवानांच्या तुकड्या आज सकाळपासूनच जम्मू-काश्मीरमध्ये पोहचायला सुरुवात झाली आहे. या जवानांना राज्याच्या विविध भागामध्ये तैनात करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ऐवढ्या मोठ्या संख्येने जवान तैनात केल्यामुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी

गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने सांगितले होते की, जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवाद विरोधी कारवाईला आणखी मजबूत करण्यासाठी सुरक्षा दलाच्या 10 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये सीआरपीएफचे 50, बीएसएफच्या 10, एसएसबीच्या 30, आईटीबीपीच्या 10 टीम तैनात करण्यात येणार होते. 

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी २ हजार अर्ज