पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक

चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घराची सुरक्षा भिंत ओलांडून त्यांना अटक करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक रामास्वामी पार्थसारथींचा त्या २८ सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. ज्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलिस पदकाची घोषणा करण्यात आली आहे.  

प्रजासत्ताक दिनी आसाम स्फोटांनी हादरले, ग्रेनेड हल्ल्याची शक्यता

रामास्वामी यांनी मागीलवर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली होती. रामास्वामी यांना अदम्य पराक्रमासाठी हे पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शांत स्वभाव, परंतु, कठोर निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी कार्ती चिदंबरम यांनाही या प्रकरणात अटक केली होती. 

गृहमंत्री देशमुख म्हणाले, न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास नाही

धीरेंद्र शुक्ला यांच्या नावाचाही पदक प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. शुक्ला यांनी जेडे हत्या प्रकरणातील आरोपी रोशन अन्सारी याला संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वीपणे आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

सुपर मॉमला पद्म विभूषण, हे आठ खेळाडू पद्म पुरस्काराचे मानकरी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:28 CBI Officers including police officer who arrest p chidambaram awarded President Medal